दिव्यांग व्यक्तीच्या मदतीला धावली प्रहार जनशक्ती संघटना
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग तरुणाला उद्योग व्यवसायातून उभारी देण्याचा प्रयत्न
कोल्हापूर/ शिवार न्युज नेटवर्क :
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कोल्हापूर शहर प्रहारचे प्रसिध्दी प्रमुख किरण काळे यांना संगणक संच भेट देण्यात आला, यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी, जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांच्यासह भाजप अल्पसंख्यांक युवा मोर्चा प्रदेश उपप्रमुख फिरोज मुजावर ,शहरप्रमुख समीर यवलुजे, युवती सचिव माधुरी मेहेत्रे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक नाम, बच्चुभाऊ कडू यांचे आदर्शवत कार्य डोळ्यासमोर ठेऊन प्रहार परिवारातील प्रमाणिक व एकनिष्ठ प्रसिध्दी प्रमुख किरण काळे यांना कॉम्प्युटर भेट देण्यात आले, या कॉम्पुटर च्या मध्मातून डिजिटल शुभेच्छापत्र, वेगवेगळ्या डिझाईन्स बनवण्यात येतील, याला लागणारे सर्व सॉ्टवेअरही शिकवण्यासाठी घरीच नियोजन केले असून त्यासाठी संगणक प्रशिक्षक अर्जुन पाटील सर यांनी मोलाचं योगदान दिले असून या माध्यमातून एक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून दिव्यांग किरण काळे यांना स्वतच्या पायावर उभा करण्याचा प्रमाणिक प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने म्हणाले, प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून दिव्यांग, निराधार ,उपेक्षित घटकांच्या मदतीसाठी विशेष उपक्रम राबविले जात आहेत, मात्र परिस्थितीने गरीब असणाऱ्या घटकाला प्राधान्याने मदत मिळाली पाहिजे, शासकीय योजना व सेवा सुविधा दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांना मदत मिळावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांच्यासह आम्ही प्रहार सेवक प्रयत्नशील आहोत असेही ते म्हणाले.