Top News

'झिम्मा' चित्रपटातील स्टार कास्ट पिंपरी-चिंचवडमध्ये

 

शिवार न्यूज नेटवर्क :


पिंपरी-चिंचवड वुमन ग्रुप पिंचीच्या विनंतीला मान देवून "झिम्मा" चित्रपटातील सिने कलाकार सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सिद्धार्थ चांदेकर, क्षीती जोग, दिग्दर्शक हेमंत ढोमे, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले आवर्जून उपस्थित होते. पीसीएमसी वुमन्स ग्रुपची स्थापना पूनम परदेशी यांनी केली असून सहा हजाराहून जास्त महिला या ग्रुपला सलंग्न आहेत.

महिला सबलीकरणासाठी हा ग्रुप काम करतो. ग्रुपच्या १०० हून अधिक मेंबरने सिने कलाकारासमवेत चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला. महिलांनी कौटुंबिक जबाबदाच्या सांभाळताना आयुष्यातील आनंदही लुटला पाहिजे असा संदेश देणारा चित्रपट असून तो जरूर पहावा, असे आवाहन सिने कलाकारांनी केले.

थोडे नवीन जरा जुने