राहुल डोंगरे/शिवार न्यूज अर्जुनवाड :
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधुन कागल तालुक्यातिल मौजे सांगाव येथे दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता अर्जुन जाधव यांच्या नेतृत्वाखाली कुमार विद्या मंदिर या शाळेतिल मुला मुलींना तसेच अंगणवाडी च्या लहान मुलांना दिव्यांग संघटनेला सुदर्शन जीन्स प्रा लि कंपनिकङुन मिळालेल्या मदतीतुन मौजे सांगाव भागातिल सर्व दिव्यांग बंधुनी सामाजिक बांधीलकी म्हणुन वही केळि फळे बिस्किट वाटप करण्यात आले .
यावेळी प्रस्तावना पाटील सर यांनी केले व कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर यांचे स्वागत श्री अर्जुन जाधव यांनी केले व सत्कार समारंभ पार पङला मनोगत व्यक्त करताना शिल्पा ठोकङे मॅङम यांनि सांगितले समाज्यातील लोकांनी अपंग बांधवाकङे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे व त्यांना शासन दरबारी जे काय सहकार्य लागेल ते करु अशा भावना व्यक्त केल्या त्यानंतर धीरकुमार कांबळे यांनी आपले मत व्यक्त करुन अपंग बांधवांचे कोरोना महामारी च्या काळा मध्ये प्रचंङ हाल झाले यावर उपाय म्हणुन अपंगांना अंतोदय देण्यात यावे हि रास्त मागणी केली व सर्व दिव्यांग बांधवाचा सत्कार ठोकङे मॅङम यांनि पुष्प देवुन केले व कांबळे यांनी आभार मानले.यावेळी श्री बाबासो चिक्कोङे महादेव हेगङे श्री नामदेव माळि श्री तानाजी पाटिल सुधिर शिंदे आदी दिव्यांग हजर होते.