हेरवाड ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
हेरवाड/शिवार न्यूज नेटवर्क:
हेरवाड येथील ग्रामपंचायत कार्यालयमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास अधिकारी पी. आर. कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी मस्के, देवगोंडा आलासे, अमोल कांबळे, विकास माळी, सुभाष शिरढोणे, कृष्णा पुजारी, रोहित कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव माळी, सुरेश पाटील, कोतवाल रमजान बाणदार, अमोल देबाजे, अभय कांबळे, ग्राम पंचायत कर्मचारी कुंभार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.