Top News

फिनिक्स कॉम्प्युटरने मुलांना त्यांचे कर्तुत्व दाखवून दिले : प्रा. संदिप सावगावे

 

फिनिक्स कॉम्प्युटरमध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न




कुरुंदवाड/शिवार न्यूज नेटवर्क:

फिनिक्सने विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणासोबत स्पर्धेच्या युगात कसे वावरले पाहिजे याचा अनुभव म्हणून वेगवेगळ्या स्पर्धांचे व मुलांच्या बौद्धिकतेच्या अनेक स्पर्धा घेऊन मुलांना त्यांचे कर्तुत्व दाखवून दिले तसेच त्यांच्या कलागुणांना ही वाव दिला आहे. असे प्रतिपादन एस.के. पाटील महविद्यालयाचे प्राध्यापक संदिप सावगावे यांनी केले.

फिनिक्स कॉम्प्युटर कुरुंदवाड या क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी ते बोलत होते.

 प्रारंभी फिनिक्स कॉम्प्युटरचे संचालक अजय भाट यांनी स्वागतपर मनोगतातून मुलांना चांगले मार्गदर्शन करून त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांना बक्षिस वितरण करण्यात आले.

यावेळी सिनिअर स्टाफ काजल कांबळे, दीप्ती जुगळे, सानिका कोले, निकिता चराटे, सोहेल जमादार, स्मिता स्वामी, अर्पिता आंबले, संजना पवार, साक्षी तूर्के, वैभव सावंत आदी स्टाफ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता स्वामी व संजना पवार यांनी केले. आभार प्रदर्शन अर्पिता आंबले यांनी मानले.



थोडे नवीन जरा जुने