Top News

दत्त महाविद्यालयाच्या जडणघडणीत स्व.सा.रे. पाटील साहेबांचे बहुमोल योगदान : रावसाहेब पाटील



कुरुंदवाड/ शिवार न्यूज नेटवर्क :

श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयात स्वर्गीय सा.रे. पाटील साहेबांचे जन्मशताब्दी वर्ष प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले, श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, श्री दत्त महाविद्यालयाच्या जडणघडणीत स्वर्गीय सा.रे. पाटील साहेबांचे बहुमूल्य योगदान आहे शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते सा.रे पाटील यांचे कार्य उल्लेखनीय आहे व अशा व्यक्तींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी भविष्यात वाटचाल करावी असे मत मांडले.

शालेय समिती सदस्य दामोदर सुतार गुरुजींनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही जीवनात जर मोठे व्हायचे असेल तर थोर व्यक्तींचे चरित्र वाचन करणे आवश्यक आहे स्वर्गीय सा.रे पाटील साहेबांनी सन 1951 मध्ये सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना केली, व 1957 साली ते शिरोळ तालुक्याचे आमदार झाले. शिक्षण, सहकार, आरोग्य व शेतीची आवड असणारे स्वर्गीय सा.रे. पाटील साहेब होते त्यामुळे दत्त सहकारी साखर कारखान्यात डिप्लोमा कॉलेज व आरोग्याची काळजी घेण्यासाठी दवाखान्याची स्थापना केली. सहकाराच्या माध्यमातून राज्यातील नामांकित सहकारी साखर कारखान्यांमध्ये आज दत्त सहकारी साखर कारखान्याचे नाव घेतले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा थोर व्यक्तींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे असे मत मांडले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एन. जी. साखरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक आणि डॉक्टर या दोन्ही घटकांना समाजामध्ये सन्मानकारक वागवलं पाहिजे असे स्वर्गीय सा.रे. पाटील यांचा कटाक्ष होता त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या व त्या संस्थांचे विश्वस्त या नात्याने अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य केले.

पाहुण्यांची ओळख करून देताना महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक एम. आर. पवार सर यांनी सांगितले की स्वर्गीय सा.रे. पाटील साहेब व स्वर्गीय प्राचार्य पी. बी. पाटील साहेबां प्रमाणेच या महाविद्यालयाच्या जडणघडणीत रावसाहेब पाटील, श्रीमती घोरपडे वहिनी, व दामोदर सुतार गुरुजी यांचाही सिंहाचा वाटा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.

महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जे. पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक करताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बहुमोल योगदान स्वर्गीय सा.रे. पाटील व स्वर्गीय प्राचार्य पी.बी. पाटील यांचे होते व त्यांच्या योगदानातूनच श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना झाली असे सांगितले

कार्यक्रमावेळी स्वर्गीय सा.रे .पाटील यांच्या जीवन चरित्र पटाचे अनावरण, चरित्र ग्रंथ प्रदर्शन व शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांनी केले प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक एम. आर. पवार यांनी केले कार्यक्रमाचे आभार व समारोप प्राध्यापिका कुमारी पिरजादे वाय. डी. यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ पाटील आर. आर. व प्राध्यापक ए. एस. कांबळे यांनी केले.

महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दत्त कारखान्याच्या कार्यस्थळी जाऊन सा. रे.पाटील साहेबांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. 

या कार्यक्रमासाठी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम भाऊ पाटील, श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष व नवभारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष गणपतराव पाटील (दादा) उपसंचालक बी. आर. थोरात, डी. एस. माने व प्रशासकीय अधिकारी, एम. के. आंबोळे, दत्त महाविद्यालयाचे कार्य अध्यक्ष व माजी प्राचार्य ए.जी. माने गावडे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते.

थोडे नवीन जरा जुने