Top News

दानोळीत गावठी हातभट्टीवर कारवाई

२५ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल नष्ट

जयसिंगपूर/ शिवार न्यूज नेटवर्क :


दानोळी (ता. शिरोळ) येथे आज आवाडे मळानजीक सरकारी पाझर तलावाजवळ आडोशास उघडयावर सुरू असलेली गावठी हातभट्टी जयसिंगपूर पोलिसांनी नष्ट केली. एकूण २५ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. शिवाजी विठ्ठल माने (रा. उमाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तो फरारी आहे.

कारवाईत चुलीवरील २ पत्र्याचे बॅरेल त्यामध्ये प्रत्येकी १०० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, रसायन अंदाजे एकुण २०० लिटर (एका लिटरला ३० रुपये) प्लास्टिकची १० पोती त्यात प्रत्येकी ३० लिटर, असे एकुण ३०० लिटर कच्चे रसायन, तयार दारू १५० लिटर (प्रत्येकी ६०रु. प्रमाणे ) एक हजार रु. त्यात रसायन उकळण्याकरीता वापरलेले लोखंडी पत्र्याचे रिकामे बरेल, काळ्या रंगाची प्लास्टिकची सरपोच नळ्या, अॅल्युमिनीयमचे डबे २ नग नष्ट करण्यात आले. पोलिस कॉन्स्टेबल वैभव लक्ष्मण सुर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.

आवाडे मळ्यानजीक असलेले सरकारी पाझर तलावाजवळ आडोशास उघडयावर विनापरवाना, बेकायदेशीरपणे भट्टी लावून दारु तयार करणेचे साहीत्य असलेले ठिकाणी मुद्देमाल टाकुन संशयित माने पळून गेल्याने त्याच्या कब्जात मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्यावर राज्य दारुबंदी अधिनिय कलम ६५ (फ) (ब) (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

थोडे नवीन जरा जुने