Top News

यशवंत सेनेचे राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवेदन

 


राहुल डोंगरे/ शिवार न्यूज नेटवर्क :

धनगर आरक्षण मध्ये बळी पडलेल्या कुटूंबातील एका व्यक्ती ला सरकारी नोकरी आणि त्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत मिळावी यासाठी राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांना यशवंत सेनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आले.

     ज्या पद्धतीने मराठा आरक्षण आंदोलनात आत्महत्या केलेल्या 34 हुतात्माच्या कुटुंबांना दहा लाख रुपये आणि कुटूंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याचे जाहीर केले गेले आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यात गेल्या कित्येक वर्षी पासून धनगर समाज्याच्या हक्काचे एस. टी. आरक्षण मिळावे या करिता धनगर समाज मागणी करीत आहे.या धनगर आरक्षण आंदोलनात आत्महत्या केलेल्या 1) योगेश कारके रा. गोमकेवाडी ता. सेलू जि. परभणी 2)परमेश्वर घोगडे रा. बालानगर ता. पैटण जि. औरंगाबाद 3)अजित कोळेकर रा. औरंगाबाद या धनगर समाजातील हुतात्मानी धनगर एस. टी आरक्षण साठी स्वतःचे आत्मबलिदान दिले आहे.यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीं आणि कुटूंबास दहा लाख रुपयाची मदत मिळावी ही मागणी निवेदना मार्फत राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांना यशवंत सेनेचे पदाधिकारी यांनी दिली आहे यावेळी यावेळी मंत्री महोदयांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले

यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अमर पुजारी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार अभय वाळकुंजे, युवा जिल्हा उपअध्यक्ष निवास कोळेकर, शिरोळ तालुका अध्यक्ष रामचंद्र दुधाळे , तालुका उपाध्यक्ष अमोल मरळे , लक्ष्मण नाईकवडे ,तालुका संघटक संभाजी डोंगरे, कार्यकारणी सदस्य बबन मिसाळ, पत्रकार राहुल डोंगरे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने