अकिवाट (ता. शिरोळ)येथील निलेश कुमार तवंदकर यांना स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ व गुणांचा आणि निष्ठावान जागृक नागरिक म्हणून निलेश तवंदकर यांना स्वराज्य स्वराज्य बहुउद्देशीय समाजकार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मा.खा.राजू शेट्टी,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ,पोलिस अधिकारी अजित पाटील, संस्थापक एजाज मुजावर नगरसेवक बजरंग खामकर,पराग पाटील,शैलेश चौगुले,तेजस कुराडे ,शंकर कदम,रौफ पटेल उपस्थित होते.