Top News

हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राची विशेष रोगप्रतिबंधक मोहीम

 संदीप कोले । शिवार न्यूज नेटवर्क :

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तालुक्यातील हेरले प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या वतीने विशेष रोगप्रतिबंधक मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांनी गावातील प्रत्येक घराला भेट देऊन नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच हिवतापाबाबत जनजागृती केली. यावेळी घरातील पाणी साठवणुकीची भांडी आठ दिवसांनी घासून स्वच्छ व कोरडी ठेवावीत, आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळावा, व्हेंट पाईपला जाळी बसवावी तसेच घर व परिसर स्वच्छ ठेवावा, अशा महत्त्वाच्या आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या.

तसेच पाणी साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅरल व सिंटेक्स टाक्यांमध्ये डासांच्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी टेमीफोस औषध टाकण्याची (टेमीफोस अॅक्टिव्हिटी) मोहीमही राबविण्यात आली.

या उपक्रमात आरोग्य सेवक अमोल उलसार, गणेश पाटील, विजय गोल्हार, आरोग्य सेविका लीना जाधव तसेच आशा सेविका शीला चौगुले, संगीता खाबडे, आरती कुरणे, सुषमा कुरणे, वहिदा खतीब, सविता खाबडे, सुवर्णा खाबडे, रूपाली खाबडे, सरोजिनी सूर्यवंशी, वर्षा डोरले, शामशाद देसाई, सुप्रिया चव्हाण आणि मदतनीस अमृता कुरणे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

थोडे नवीन जरा जुने