इसाक नदाफ । शिवार न्यूज नेटवर्क :
औरवाड येथील अल्ताफ इकबाल मुल्ला यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा संघटकपदी नुकताच निवड करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही नियुक्ती जाहीर केली. त्यांच्या निवडीमुळे संघटनेचे कार्य जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे विस्तारेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नवनियुक्त जिल्हा संघटक अल्ताफ मुल्ला यांनी संघटनेने दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार मानत मुस्लिम ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी, शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक कार्य अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. एम.जी बागवान, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीर फकीर, जिल्हा अध्यक्ष जमाल फकीर, जिल्हा उपाध्यक्ष मियाखान मोकाशी, जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई नदाफ, जिल्हा उपकार्याध्यक्ष अस्लम मुल्ला, जिल्हा सरचिटणीस अन्सार पटेल, तालुका अध्यक्ष सरदार जमादार, तालुका उपाध्यक्ष काशीम मुल्ला, तालुका संघटक अरमान मुजावर, तालुका सचिव अब्बास मुजावर, ओबीसी संघटना प्रवक्ते रमजान नदाफ, कवठेसार शहर अध्यक्ष समीर फकीर, महिला कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रेश्मा चिल्लू, जिल्हा उपाध्यक्ष शमा खलिफा, तालुका उपाध्यक्ष शानम इनामदार त्याचबरोबर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
