Top News

जयसिंगपूर ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड रशीद हेतवडे

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : 

जयसिंगपूर ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड रशीद हेतवडे, उपाध्यक्षपदी ॲड सुशील जगदाळे, सचिवपदी ॲड संतोष खामकर तर खजिनदारपदी ॲड शितल कांबळे यांनी विजय मिळविला. 

    तसेच महिला प्रतिनिधी म्हणून ॲड मुक्ता माणगावे, महिला राखीवपदी ॲड संध्या भियूंगडे, ॲड प्रिया कुरणे, जनरल कार्यकारिणीमध्ये ॲड आरती बिंदगे, ॲड कालिदास कांबळे यांनी विजय मिळविला. ॲडव्होकेट बार असोसिएशनचे मावळते अध्यक्ष ॲड धनंजय पाटील यांनी विजयी पॅनलचे नेतृत्व केले. सर्व जेष्ठ व कनिष्ठ वकिलांनी निवडणुकीत सहभाग घेतला. 

    ॲड. धनंजय पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भरीव कामे करण्याचा प्रयत्न केला. वकील बंधू-भगिनींसाठी विमा उतरविला आहे. विविध कार्यात कुरुंदवाड, इचलकरंजी ॲडव्होकेट बार असोसिएशनचेही चांगले सहकार्य मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी सर्वच वकिलांच्या माध्यमातून आंदोलनात सहभाग, 

    जेष्ठ वकील मंडळींचा उच्च न्यायमूर्तींच्या हस्ते सन्मान, न्यायालय परिसरात स्वछता मोहीम, नवीन व जादा न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी पाठपुरावा, व्याख्याने, ई फायलिंग ट्रेनिंग कॅम्प, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आदी कार्य दोन वर्षात करण्यात आली आहेत. नवीन कार्यकारिणीदेखील वकिलांच्या हितासाठी कार्यरत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

थोडे नवीन जरा जुने