हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
घोसरवाड ता.शिरोळ येथील कोल्हापूर महानगरपालिकेचे सेवानिवृत्त शिक्षक बाळासाहेब मारुती कांबळे यांनी सेवानिवृत्तीनंतर कन्या विद्या मंदिर घोसरवाड येथे बजावलेली कंत्राटी हंगामी सेवा महत्त्वाची आहे.मुलींच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले.तसेच मुलींच्या शैक्षणिक साहित्यासाठी रोख रक्कम सुुुपुर्द केली.त्यांची सेवाभावीवृत्ती महत्वाची असल्याचे प्रतिपादन कन्या विद्या मंदिर घोसरवाडचे मुख्याध्यापक रमेश शंकर कोळी यांनी केले.
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी स्वरुपात हंगामी शिक्षक नेमण्यात आले होते. त्यावेळी श्री.बाळासाहेब कांबळे कन्या विद्या मंदिर शाळेत रुजू झाले होते.आपल्या सेवाकाळात सर्वांशी समरस होवून विद्यादानाचे कार्य केले होते.त्या निमित्त त्यांच्या सदिच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्याध्यापक रमेश कोळी यांचे हस्ते भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे दिलीप शिरढोणे यांनी कांबळे सरांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी हिंदूराव फास्के,रमेश मारूती कोळी,विद्याधर मोकाशी,गुंडा परीट,ज्योती परीट व स्वाती खुरपे यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होते.
