Top News

कु. अक्षरा गुरवचे आगळेवेगळे रक्षाबंधन

सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी व त्यांच्या गावी असणाऱ्या मुलासाठी पाठविल्या राख्या 



संजय चव्हाण / शिवार न्यूज नेटवर्क :

 लहान मुलांचे वय हे खरंतर खेळण्या व बांगड्याचे असते. पण आता मोबाईल व कॉम्प्युटरमुळे मुलांमधील कल्पनाशक्ती कमी होत चालली आहे असे दिसते. मात्र समाजात आजही काही मुलं आपल्या कल्पनाशक्तीचा परिपूर्ण उपयोग करतात. 

त्यांच्यातील एक म्हणजे कुमारी अक्षरा गुरव (रा.साळस्ते तालुका कणकवली जिल्हा .सिंधुदुर्ग) गेल्या तीन-चार वर्षापासून अक्षरा गुरव नावाची मुलगी आपल्या कल्पकतेच्या बळावर असाच एक वेगळा उपक्रम राबवत आहे. कोरोना काळापासून ती दरवर्षी स्वतःच्या हाताने राख्या तयार करून सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना पाठवत आहे. असेच एक दिवशी अक्षरा गुरव हिचे राखी चे पत्र सैनिक परंपरा असलेल्या सैनिक टाकळीचे जवान हवालदार संजय निकम सेना भवन दिल्ली येथे कार्यरत असताना त्यांच्या हाती पडले आणि तेथूनच अक्षरा गुरव आणि सैनिक टाकळीच्या जवानांची ऋणानुबंध वाढण्यास सुरुवात झाली. 

     सैनिक टाकळी येथील बऱ्याच जवानांच्या बरोबर अक्षराचे नियमित संभाषण होत असते. यावर्षी सुद्धा अक्षराकडून या गावाचे जवान जेथे जेथे कार्यरत आहेत. तिथे राख्या पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत घरदार विसरून प्राण्याची बाजी लावणाऱ्या त्या अनाम जवानांसाठी कोणीतरी आठवण प्रेमाने राखी पाठवले असते प्रेमाचे चार शब्द लिहिले असतात ते बघून एरवी आपल्या माय भूमी कडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या शत्रूंचा कर्दन काळ आसलेला रांगड्या गडी हळवा भाऊक होतो. नवी उर्मी घेऊन आनंदाने नाचतो व गातो. जवानाबद्दल आपला आदर प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्य जनता ही अतुर असते पण आपली भावना कशी व्यक्त करावी त्यांना माहीत नसते. पण राखीचे प्रेम भाग्याने भाऊबंदन जुळण्याची संधी दिली आहे हे बंधन जुळण्यासाठी जवानांनी सर्वसामान्य नागरिक यांच्यातील आहे. ती कोकणातील अक्षरा गुरव. यावर्षी तिने त्या जवानांची मुले शिकत असलेल्या शाळेमध्ये त्यांच्या मुलांना राख्या बांधण्यासाठी आपण स्वतः तयार करून शंभर राख्या सैनिक टाकळी गावातील माजी सैनिक बी.डी .पाटील यांच्या नावावरती पाठवून खरोखरच देश सेवेसाठी तत्पर असलेल्या सैनिक व त्यांच्या परिवारावर किती जिव्हाळा आहे हे दाखवून दिले आहे. अक्षरा गुरव हिने पाठवलेल्या राख्या सैनिकांची मुले असलेल्या कुमार व कन्या विद्या मंदिर सैनिक टाकळी येथे देऊन तेथे रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा पार पडला यावेळी दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापिकाने अक्षरा गुरव व त्याच्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. व आपल्या विद्यार्थ्यांना तिचा आदर्श घ्यावा असे सांगितले. या रक्षाबंधनाच्या सोहळ्यास दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग व मुले मुली व माजी सैनिक बी.डी .पाटील. सुहास जाधव. दीपक पाटील. हजर होते. त्यावेळी माजी सैनिकांनी अक्षरा गुरव तुला आम्हासैनिक टाकळीकर कडून व जवानांकडून तुला सलाम तू सतत असाच उपक्रम राबवत जा आणि आम्हा सैनिकांचे मनोधैर्य वाढवत जा जेणेकरून आम्ही सर्वजण भारत मातेच्या सेवेसाठी तत्पर राहील, असे मनोगत व्यक्त केले.

थोडे नवीन जरा जुने