Top News

गणेशउत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभुमीवर शिरोळ पोलीस ठाण्याच्या वतीने काढण्यात आला ‌‘ रूट मार्च ‌’‌

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

  अगामी गणेशउत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभुमीवर आज शिरोळ पोलीस स्टेशनच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला.

  गणेशउत्सव, दहीहंडी, उत्सवकाळात समाजात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी. समाज कंटकावर वचक राहुन उत्सव भयमुक्त, आनंदी वातावरणात पार पडवा. यासाठी आज शिरोळ पोलीस स्टेशनच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये फायरबिग्रेड गाडी,ॲम्ब्युलन्स,पोलीस व्हॅन आणि दंगल नियंत्रन पथकाचा समावेश होता. शिरोळ पोलीस स्टेशन पासुन सुरू होवून, जय भवानी चौक,छत्रपती संभाजी चौक मार्गे ताराराणी तख्त असा रूट मार्च काढण्यात आला. दंगल नियंत्रन पथकाचे दंगल काबू पथकाच्या वतीने प्रात्यक्षिक घेण्यात आले. आचनक काढण्यात आलेल्या रूट मार्च मुळे नागरीकांत सभ्रम निर्माण झाला होता.

   यावेळी शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शिवाजी गायकवाड, जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पि.आय. सत्यवान हाके, शिरोळ पोलीस स्टेशन स्टॉफ, जयसिंगपूर पोलीस स्टेशन स्टॉफ,मुख्यालयाकडील सि.बील स्ट्रायकिंग फोर्स आदींचा समावेश होता.

थोडे नवीन जरा जुने