कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने कुरुंदवाड येथील शिवतीर्थ जवळ पाणी आल्याने कुरुंदवाड - नृसिंहवाडीचा संपर्क तुटला आहे. तर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास हेरवाड - तेरवाड मार्गावर पाणी आल्याने या मार्गांवरील वाहतुक बंद झाली आहे.
शिरोळ तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे आणि धरण पाणलोट क्षेत्रातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कुरुंदवाड - नृसिंहवाडीचा व हेरवाड - तेरवाड मार्ग पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
