Top News

तालुक्यातील रस्ते विकासाला प्रथम प्राधान्य : आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर

  १० कोटींच्या निधीतून नृसिंहवाडी - गणेशवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी महायुती सरकार खंबीर असून नुकत्याच बजेट पुरवणीतून तालुक्याला सुमारे १९५ कोटींचा निधी प्राप्त झाला असून याच्या माध्यमातून तालुक्यात विकास कामे केली जात आहेत. नदीपलीकडील सात गावांतील दळणवळणासाठी प्रामुख्याने रस्त्यांच्या विकासासाठी निधी खर्च केला जात आहे, रस्ते मबजूत व पक्की बनविण्याच्या दृष्टीने येथील कामे केली जातील व रस्त्यांचा विकास केला जाईल, असा विश्वास आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला.

राज्य मार्ग १५३ पासून नृसिंहवाडी-औरवाड-कवठेगुलंद माळ-गणेशवाडी ते राज्य मार्ग हद्दीपर्यंतच्या रस्त्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला असून या रस्त्यांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.

प्रारंभी आमदार डॉ.यड्रावकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते पुढे म्हणाले, श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्तप्रभुंच्या दर्शनाकरिता कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक गणेशवाडी-कवठेगुलंद व औरवाड मार्गे येत असतात. या मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यामुळे वाहनधारकांच्या, ग्रामस्थांच्या आणि प्रामुख्याने भाविकांच्या सोयीसाठी हा रस्ता करण्यात येणार आहे, त्यामुळे याचा लाभ सर्वांना होणार असून या परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, रस्ते विकासाबरोबर तालुक्यातील प्रत्येक गांवचा विकास साधण्यासाठी राज्य शासनाने गेल्या चार वर्षात मोठा निधी प्राप्त करुन दिला आहे. या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते, गटारी, नविन रुग्णालयांची उभारणी, विविध समाजासाठी हॉल, नविन तलाठी कार्यालय, विविध पुल, बंधारा दुरुस्ती, शासकीय वसतीगृह, शासकीय विश्रामगृह यासह विविध कोट्यवधी रुपयांची कामे शिरोळ तालुक्यात पुर्णत्वास आली असून यापुढेही शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी लोकनियुक्त सरपंच शफी पटेल, सरपंच प्रशांत अपिने, सईद पटेल गुरुजी, लतिफ पटेल, दादेपाशा पटेल, अखलाक पटेल, रामचन्द्र रावण, एम जी पटेल, रमेश रावण, फारुख पटेल, तनवीर बहादुर, यासीन बहादुर, नियाज जनाब, अफसर पटेल, रविन्द्र माने, दिलिप मंगसुळे, राजू जंगम, नारायण गावडे, असलम मुल्ला, बाळू शेट्टी, प्रशांत मंगसुळे, विशाल दुग्गे, राजू गावडे, पोपट गावडे, संजय कांबळे व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने