अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
शेतकऱ्यांची जीवनदायी असलेल्या दुधगंगा तथा काळमवाडी धरण पाणलोट क्षेत्रात सतत मुसळधार पावसाने थैमान घातले असून काळमवाडी धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे त्या कारण काल धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे काल धरणातून दोन दरवाजे उघडले असून दूध गंगा नद्यांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन संबंधित गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
काल कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यात सतत धार अतिवृष्टीमुळे नदीपात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बोरगाव सदलगा मार्ग पूर्ण बंद झालेले आहे, बोरगाव सदलगा दरम्यान असलेल्या बंधाऱ्यावर रात्री पाणी आल्याने पूर्णपणे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बोरगांव येथील लक्ष्मी येथे पाणी आल्याने जनवाड मार्गे वाहतूक चालू होती मात्र कालच्या अतिृष्टीमुळे नद्यांचा पाणी पात्रात वाढ होऊन बोरगांव सदलगा बंधाऱ्यावर पाणी आले आहे. सदलगा पोलीस स्टेशन व एन डी आर एफ टीम आणि प्रशासनाच्या वतीने पूर्णपणे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
