Top News

पंचगंगा नदी पूराचे पाणी माणकापुर फाट्यावर आल्याने नागरिकांत धाकधुक वाढली

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

       धरण पाणलोट क्षेत्रात होणारा मुसळधार पावसामुळे संपूर्ण जीवन विस्कळीत झाले आहे.पंचगंगा नदीच्या पूराचे पाणी माणकापूर फाट्यावर आल्याने मानकापूर वासियांची धाकधुक वाढली आहे.

      पंचगंगा नदीच्या पाण्याचा फटका महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर आसलेल्या कर्नाटकातील माणकापूरला बसत आहे,दिवसेंदिवस पूर जन्य परिस्थिती निर्माण होत आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होवून माणकापूर गावच्या वेशीवर .पाटील मळा, रांगोळी फाटा येथे पाणी आले आहे .येथील पानपट्टी दुकाने व पीक अपशेड पाण्यात आहेत.त्यामुळे या मार्गावरील वहातुक बंद झाली आहे.तसेच रांगोळीचा संपर्क तुटला आहे. माणकापूरात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असून पंचगंगा नदीच्या पूराच्या पाण्याचा फटका बसतो. गेल्या दोन वर्षांच्या महापूरातील कारखानदार यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच तलाठी यांनी पंचनामे केले पण ज्यांचे नुकसान झाले नाही अशा मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.त्यामुळे यंदा तरी पारदर्शक पीकांचे व पावसाने पडलेल्या घरांचे पंचनामे करावे अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.पूराच्या पाण्याचा धोका ओळखून ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

थोडे नवीन जरा जुने