Top News

गुरुजनांकडून वास्तवातल्या रियल हिरोंचा सत्कार

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

चांगल्या कामाचे कौतुक व्हावे लागते.त्यामुळे काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते.कामाची पोचपावती मिळाल्याने अधिक चांगले काम करण्याची उर्जा मिळते.याचेच भान ठेवून काम करणाऱ्या गुरुजनांनी एकत्र येवून वास्तविक जीवनातल्या रियल हिरोंचा अर्थात पोलिसांचा सत्कार केला.

           कुरुंदवाडमधील १ लाख११ हजाराच्या चोरीचा उलघडा अवघ्या २४ तासात मुख्य सुत्रधारासह ५ संशयितांना जेरबंद करण्याची किमया इचलकरंजीचे पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड पोलिस स्टेशनचे सपोनि रविराज फडणीस, पीएसआय सागर पवार, सागर खाडे, शिरीष कांबळे, फारूख जमादार, विवेक कराडे,नागेश केरीपाळे या पोलिस कर्मचाऱ्यांनी ही किमया केली.

        कुरुंदवाड माळभाग येथील भरवस्तीतील मुक्ताई कॉम्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ३ मध्ये राजेंद्र कापसे यांच्या घरातील भरदिवसा झालेली चोरी म्हणजे पोलिसांना दिलेले एक आव्हान होते.मात्र कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व अनुभवाच्या आधारे अवघ्या २४ तासांत संशयितांना अटक करुन जनतेमध्ये पोलिसांप्रती असणारा विश्वास अधिक दृढ केला.

        याबद्दल कुरुंदवाड परिसरातील गुरुजनांनी सत्कार केला व कौतुक केले.याप्रसंगी अल्लाबक्ष नदाफ,प्रसिध्द लेखक व वैद्य अशोक गायकवाड, मेहबूब मुजावर,रमेश कोळी,अशोक कोळी,सतिश यळगुडे,दिलीप शिरढोणे, पत्रकार सुरेश कांबळे,संतोष तारळे, कुलदीप कुंभार उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने