अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक तालुका कुंभार समाजाचे माजी अध्यक्ष श्री माणिक कुंभार यांना राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
26 मे रोजी गोवा येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.देश पातळीवर मानाचा समजला जाणारा व आंतरराष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा हा पुरस्कार म्हणजे विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह,मैसूर फेटा,चंदनाचा कायमस्वरूपी हार व भारत सरकारचे अभिनंदन पत्र आशा स्वरूपाचा आहे.
माणिक कुंभार यांना सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड होती .या हेतूने त्यांनी 2010 साली ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेm त्यानंतर 2016साली नगरपंचायतीचे नगरसेवक व 2021 साली पुन्हा त्यांची नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. या काळात त्यांनी अनेक भरीव कामगिरी केली. याची अवचित्य म्हणून राज्य काँग्रेस कमिटी कडून त्यांची 2018 साली कर्नाटक प्रदेश असंघटीत कामगार संघटनेची राज्य कार्यदर्शी म्हणून निवड करण्यात आली .त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने याची धुरा सांभाळत कामगारांचा कल्याण केला. तसेच 2016साली तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. पाच वर्ष कारकिर्दी त्यांनी चिंचली येथे मोठ्या समुदाय भवानीची निर्मितीसाठी प्रयत्न केले. गावातील व्यापारी व कामगार वर्गाला वेळेत पत मिळावी या हेतूने त्यांनी भाग्यलक्ष्मी संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या मार्फत त्यांनी अनेक गोरगरिबांचे कल्याण केले आहे.
जेष्ठ नेते सहकार रत्न रावसाहेब पाटील ,उद्योजक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहेत .गावातील महादेव ,हनुमान, मंदिर तसेच अनेक मंदिरांच्या जिर्णोदरा करिता त्यांनी आर्थिक सहाय्य केले आहेत. प्रभाग क्रमांक 14 व 4 मध्येही त्यांनी अनेक भरीव कामे केली आहेत.कार्याची दखल घेत,त्यांना सन 2024 च्या राष्ट्रीय पातळीवरील "सामाजिक सेवा गौरव" पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
दिल्ली,कर्नाटक,महाराष्ट्र,गुजरात,गोवा राज्यांच्या सहभागाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या महाविद्यालयात भारतीय सैन्य दलातील अधिकारी,सिने कलाकार,शिक्षण अधिकारी,राजकीय नेते व माठाधिशांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार 26 मे 2024 रोजी गोवा येथे प्रदान करण्यात येणार आहे. *. नगर सेवक माणिक कुंभार यांना राष्ट्रीय पातळीवर सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचें सर्वत्र कौतुक केले जात आहे.
