शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
वृक्ष लागवडीमुळे शिरोळ बसस्थानकाच्या परिसरात नैसर्गिक वातावरण लाभले असून पाणी , वीज बचत करून प्रदूषणमुक्त पर्यावरण राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. स्वच्छ हवा आणि फळे देणाऱ्या झाडांच्या वृक्षारोपणामुळे माणसाचे आयुष्य आनंदी होणार आहे. शिवाय अशा उपक्रमामुळे पशुपक्षी यांचेही संवर्धन होणार आहे. तेव्हा निसर्गाचा आनंद घेत निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करावे असे मत पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ कलाकार राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.
येथील नगरपरिषद व पर्यावरण प्रेमी ग्रुपच्या वतीने जागतीक वसुंधरा दिनानिमित्त शिरोळ येथील बसस्थानक परिसरात वृक्षारोप लागवड करून वसुंधरा अभियान जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे होते. यावेळी झाडे लावा, झाडे जगवा..... पर्यावरणाचे रक्षण करा ! असा घोषणा देवून पर्यावरण प्रेमानी सर्वांचे लक्ष वेधले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनिल बागडी,सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने , खंडेराव हेरवाडे यांची भाषणे झाली. शिरोळ बसस्थानकाचे नियंत्रक मोहन गावडे , शिरोळ नगरपरिषद कर्मचारी साहिल मकानदार , प्रमोद कोळी , सचेतन बनसोडे ,अनिल लोंढे , बसस्थानक महिला कामगार गायकवाड यांच्यासह प्रवासी व नागरिक उपस्थित होते.
