हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत केंद्र स्तरावर प्रथम आल्याबद्दल हेरवाड हायस्कूल हेरवाडचा आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व गटशिक्षणाधिकारी मा.सौ.भारती कोळी यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते शिल्ड, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला...कृष्णा हॉल नांदणी (ता.शिरोळ) येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या स्पर्धेतशा ळांचे बाह्यांग, परिसर,भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता,शासकीय योजनांची अंमलबजावणी, अभिलेखे इत्यादी सर्व माहिती तपासण्यात आली होती.विद्यालयातील सर्व शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी खूप सहकार्य केले.यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रावसाहेब उर्फ दा.आ.पाटील, उपाध्यक्ष श्री प्रभाकर कनवाडकर,सचीव श्री अजीत पाटील,सर्व संचालकांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.
याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, पुरस्कार प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते. आभार शिक्षण विस्तार अधिकारी एन.व्ही.पाटील यांनी मानले तर सूत्रसंचलन महेश घोटणे व किरण पाटील यांनी केले.
