Top News

शिरोळ तालुक्याच्या सर्वांणगीन विकासासाठी कटीबध्द : माधवराव घाटगे

१३ कोटी रूपयांच्या रस्ते कामाचे उदघाटन

शिरोळ तालुक्यातील १३ कोटी रुपयांच्या रस्ता रुंदीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला . शेजारी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, रामचंद्र डांगे, राजवर्धन नाईक - निंबाळकर , विजय भोजे, मुंकुद गावडे आदी

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : 

शिरोळ तालुका हा सधन तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये रस्ता, गटर्स या सारख्या पायाभूत सविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठी मी गुरूदत्त शुगर्स च्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करित असून, शिरोळ तालुक्याच्या सर्वाणगीन विकासासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन श्री गुरूदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले. चिंचवाड व टाकळीवाडी- अकिवाट येथिल १३ कोटी रूपयांच्या रस्ता रुंदीकरण कामाच्या शुभारंभ कार्यक्रम प्रंसगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व वस्त्रोउदयोगमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून नवीन मंजूर झालेला प्रमुख जिल्हा मार्ग (MDR) क्र.१२३ मधील चिंचवाड ते दत्त कारखाना पहिला स्टॉप या मार्गावरील ५.५ कि.मी रस्त्याच्या रूंदीकरणासाठी ८ कोटी रूपये तसेच अकिवाटटेक ते बाळूमामा मंदिर कमानीपर्यंत २.५ कि.मी रस्त्याचे रुंदीकरणासाठी ५ कोटी असे एकूण १३ कोटी रुपयांच्या निधी प्राप्त झाला असून त्यांचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आला आहे. ऊस हंगाम सुरू झालेनंतर व इतर वेळी रस्त्यावरील होणारी वाहनाची वर्दळ, अवजड व इतर वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता मोठ्या रस्त्यांची गरज यामुळे पूर्ण होणार आहे.

श्री. घाटगे म्हणाले, शिरोळ तालुक्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आतापर्यंत ६२ कोटी रूपयांची विकासकामे केली आहेत. पण आम्ही मंजूर केलेली विकास कामाचे श्रेय दुसरे कोण तरी घेत असेल तर मी गप्प बसणार नाही. ज्यांनी काम मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले त्यालाच त्या कामाचे श्रेय दिले पाहिजे. न केलेल्या कामाचे श्रेय कोणी लाटण्याचे प्रयत्न केल्यास त्यांची योग्य वेळी दखल घेतली जाईल.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, जि.प सदस्य विजय भोजे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुरूदत्त चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे, कुरूंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद माने, शिरोळ भाजपा तालुकाध्यक्ष मुंकुद गावडे, शिरोळचे नगरसेवक संभाजी भोसले, श्रीवर्धन माने-देशमुख, पं.स चे माजी उपसभापती सुदर्शन ककडे, अजित चौगुले, गुरूदत्त चे संचालक बबन चौगुले, शिवाजीराव माने-देशमुख, शिवाजी सांगले, आण्णासाहेब पवार, धोंडिराम नागणे, चिंचवाडचे सरपंच जालिंदर ठोमके, उपसरपंच बाबासो चौगुले, अकिवाटचे सरपंच वंदना पाटील, उपसरपंच प्रकाश रायनाडे, टाकळीवाडीचे सरपंच मंगल बिरणगे, उपसरपंच प्रमिला आवटे, चिंचवाड चे माजी सरपंच विठठल घाटगे, टाकळीवाडीचे माजी सरपंच बाबासाहेब वनकोरे, तुकाराम चिगरे, कुशालआबा कांबळे, सुरेश सासणे अकिवाट-टाकळीवाडी चे सर्व ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार राजेंद्र चव्हाण यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने