प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड परिसर पत्रकार संघाचे वतीने नवे दानवाड चे सामाजिक कार्यकर्ते सज्जन सिंग रजपूत यांना सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,कुरूंदवाडचे प्रशिध्द पोटविकारतज्ञ डॉ राजीव जाधव यांच्या हस्ते या पुरस्काराने गौरवण्यात आले, सज्जन सिंग रजपूत हे परिवहन महामंडळातून सेवावृत्ती घेऊन शिरोळ तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक पदाच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित दत्तवाडचे सरपंच चंद्रकांत कांबळे, गुरुदत्त शुगरचे संचालक बबन चौगुले, उपसरपंच अकबर काले, सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार सिदनाळे, मुख्याध्यापक दिलिप शिरढोने, यांच्या सह गावातील विविध मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
