सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम पार पडला. या उपक्रमात सहभागी होऊन विद्या मंदिर नांगनूर शाळेने गडहिंग्लज तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागात वसलेल हे गाव गडहिंग्लज तालुक्यातील पूर्व भागातील स्वच्छ व सुंदर आहे. सुंदर व गुणवंत आदर्श उपक्रमशील असणारी विद्या मंदिर नांगनूर शाळा नाविन्याचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेमध्ये सतत विविध उपक्रम राबविले जातात यामध्ये वर्ग सजावट, बोलक्या भिंती , सेंद्रीय परसबाग, विद्यार्थी बचत बँक, पहीली पासून प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शन, शालेय स्नेहसंमेलन, क्रिडा स्पर्धा, सहल, मुलांना आर्थिक व्यवहाराची ओळख व्हावी यासाठी बँक, पतसंस्था, पोस्ट ऑफीस असे विद्यार्थी विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम विद्या मंदिर नांगनूर शाळेत राबविले.
या अगोदर विद्या मंदिर नांगनूर शाळेने तालुक्यात शालेय पारसबाग स्पर्धेत 'सुंदर शाळा ' पारितोषक सलग दोन वर्षे पटकावले आहे. शालेय क्रिडा स्पर्धेत शाळेने दरवर्षी जिल्हा स्थरांपर्यंत झेप घेतलीली असुन केंद्र व तालुक्यात विजय मिळवला आहे. अशी उपक्रमाशील असणा-या विद्या मंदिर नांगनूर च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा पुरस्काने रोवला आहे. मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कारामध्ये शाळेला एक लाख रुपये व प्रशस्ती पत्रक मिळणार आहे. यासाठी शाळेचे परीक्षण करण्यासाठी गडहिंग्लज तालुक्याचे गटविकास अधिकारी शरद मगर, गट शिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ, केंद्र समन्वयक चंद्रकात जोशी हेबाळ, केंद्राचे केंद्र समन्वयक अरुण देशपांडे, सुनिल पीटे, या टिमने परिक्षण केले व तालुक्यातील १३५ शाळांच्या मधून विद्या मंदिर नांगनूर ने तिसरा क्रमांक पटकावला.
यासाठी मुख्याधिपीका सुनिता दवेरकर,राजेंद्र गोणी, अर्चना कोरवी, परमेश्वर ससाणे, या सर्व शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे व सर्व उपक्रम यशस्वी राबविल्याने शाळेला तालुक्यामध्ये नंबर आला व पारितोषिक मिळाले.
यासाठी विशेष सहकार्य लाभले ते शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, सरपंच व उपसरपंच सदस्य, गावातील विविध संस्थेचे सर्व पदाधिकारी, आजी माजी विद्यार्थी, गावातील सर्व तरुण मंडळे व सर्व ग्रामस्थ या सर्वांचे सहकार्य लाभले.
