अभिनंदन सुंके / शिवार न्यूज नेटवर्क :
शांती सरोज नेत्रालय मिरज व इंडियन असोसिएशन मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक काचबिंदू सप्ताह निमित्त मिनी मॅरेथॉन चे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमास मिरज झोनचे डी वाय एस पी श्री प्रणील गिलडा, गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुधीर भालेराव तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दाखवली.
सदर मिनी मॅरेथॉन चा रूट शांतीसरोज नेत्रालय ते कृपामयी रुग्णालय व परत असा होता. सदर मिनी मॅरेथॉन मध्ये 170 लोकांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना डॉक्टर सौ पूजा भोमाज यांनी सांगितले की काच बिंदू हा मोतीबिंदू नंतर होणारा जगातील दुसरा नेत्ररोग आहे सदर नेत्ररोगामुळे रुग्णांची गेलेली दृष्टी परत आणणे जवळपास अशक्य आहे. त्याचमुळे वेळेत केलेल्या तपासणी व लक्षात आलेल्या लक्षणांमुळे सदर नेत्र रोगावर लवकर उपचार केल्यास होणारा धोका टाळता येतो कार्यक्रमाचे अध्यक्ष व शांतीसरोज नेत्रालयाचे डायरेक्टर डॉक्टर शरद भोमाज यांनी सांगितले की दर सहा महिन्यांनी नेत्र रुग्णालयात जाऊन तपासणी केल्यास काचबिंदूचे धोके कमी होतात व दृष्टीदोष टाळता येऊ शकतो.
शांती सरोज नेत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी सदर मिनी मॅरेथॉन चे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व नेटक्या रीतीने पार पाडले. त्याबद्दल डॉ. शरद भोमाज व डॉ. पूजा भोमाज यांनी सर्वांचे आभार मानले.
