Top News

कुरुंदवाड यात्रेच्या मंडप उभारणीचा शुभारंभ

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

      कुरुंदवाडची कृष्णावेणी यात्रेसाठी साडेपाच एकर शेती शेतकऱ्यांनी देऊ केल्याने प्रशासक आशिष चौहान यांच्या हस्ते यात्रा मंडप उभारणीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यात्रेच्या जागेबाबत न्यायालयीन बाबी निर्माण झाल्याने जागा उपलब्ध होणार की नाही? यात्रा भरणार की नाही? अशी कुरुंदवाडकरांना काळजी लागली होती. मंडप उभारणीचा शुभारंभ झाल्याने यात्रा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

         शिवतीर्थ ते सुब्रमणेश्वर मंदिर कृष्णा घाटापर्यंत शेतीवर अनेक वर्षापासून यात्रा भरत होती मात्र काही शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान करून यात्रा भरवू नये असा निर्वाळा शेतकऱ्यांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.याबाबत मुंबई उच्च न्यायालयात आणि जिल्हा न्यायालयात कामकाज सुरू आहे.

          गेल्यावर्षी कुरुंदवाडचे उद्योजक दिलीप घोरपडे यांनी शिवतीर्थ परिसरातील आपल्या मालकीची जमीन यात्रा भरविण्यासाठी दिली होती.यावर्षी एकूणच साडेपाच एकराचे क्षेत्र मिळाल्याने त्याठिकाणी यात्रा भरविण्याचा पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे.सालाबादप्रमाणे जुन्या जागेच्या ठिकाणीच

 श्रीफळ वाढवून साडेपाच एकराच्या ठिकाणी यात्रेच्या मंडप उभारणीचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर,सुनील कुरुंदवाडे,जैनुल बागवान,आदींनी आपल्या मनोगतातून पुढच्यावर्षी यात्रा जुन्या जागेत शासकीय रस्त्यावर भरवण्याच्या दृष्टीने प्रशासकांना सर्वतोपरी सहकार्य राहील यात्रेसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्याचे धन्यवाद मानले.यावेळी पूजा पाटील,प्रदीप बोरगे,अभिजित कांबळे,प्रसाद माने,सचिन थरकार, संकेत कोथळे,शकील गरगरे,राजू देवकाते,टिक्काखान पठाण,सुनील कुरुंदवाडे,राजू अत्तार,दस्तगीर फकीर,अक्रम गोलंदाज आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने