प्रा. अमोल सुंके / शिवार न्युज नेटवर्क
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामपंचायत अकिवाट व शरद कृषी महाविद्यालय जैनापूरच्या कृषी कन्यांच्या उपस्थितीमध्ये अकिवाट या गावांमध्ये दिनांक 29/ 2 /2024 रोजी शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे प्रमुख विषय डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना तसेच सेंद्रिय शेती व रोपवाटिका व्यवस्थापन असे होते .या अंतर्गत माननीय शशिकांत कांबळे (मंडळ कृषी अधिकारी, कुरुंदवाड) यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्यांनी वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांचे उदाहरण दिले. त्याचप्रमाणे मातीचे आरोग्य कसे राखावे, रासायनिक खतांचा वापर हळूहळू कमी करून घरे आणि स्थानिक परिसंस्था मधून तयार केलेल्या खताच्या माध्यमातून शेती कशी करावी त्याचप्रमाणे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत रोपवाटिका व्यवस्थापन व त्याला मिळणारे अनुदान याबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन उत्तमरीत्या रोपवाटिकेतील व्यवस्थापन कसे करावे हे देखील शेतकऱ्यांना समजावून सांगितले. शेतकऱ्यांमधून कोणीतरी पुढे येऊन गट निर्माण करावी व त्या गटाला तीन वर्षाकरिता निवड करून त्यांना लागणारा अनुदान खर्च कृषी विभागाकडून देण्यात येणार आहे असे प्रतिपादन केले
केले. शशिकांत कांबळे साहेबांना महाराष्ट्र राज्य डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सेवा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्री सुहास पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री उलागड्डे यांनी केली
कार्यक्रमाची प्रस्तावना शरद कृषी महाविद्यालय जैनापूरच्या कृषीकन्यांनी प्रगती पडवळ यांनी केली. प्रस्तावना करताना त्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व ग्रामीण कृषी जोड औद्योगिक कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा आराखडा शेतकऱ्यांना दिला त्याचप्रमाणे त्यांनी गावात सेंद्रिय शेतीबरोबरच स्वतःची रोपवाटिका कशी व्यवस्थापित करावी याबाबतीत देखील आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मा. अर्जुन राठोड (कृषी सहाय्यक अकिवाट) ग्रामपंचायत सदस्य शितल हळींगळे सर ,हे उपस्थित होते. कार्यक्रमास शरद कृषी महाविद्यालय जैनापूरच्या कृषी कन्या मिताली कोळेकर ,इंद्रायणी लाड, स्नेहल माळी, हरीशा पाटील ,प्रगती पडवळ ,श्रावणी शिंदे व वैभवी तेलवेकर या देखील उपस्थित होत्या. या चर्चासत्रात बहुसंख्य शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
