जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे .
जयसिंगपूर येथील शिवसैनिक रफिक भाई आतार यांनी मुंबई येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली याबाबत शिवसेनाप्रमुख हे येत्या एक-दोन दिवसात निर्णय घेतील असा विश्वास रफिक भाई आत्तार यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वोच्च असेल व मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असेही त्यांनी शेवटी सांगितले मिरज जिल्हा सांगली येथे महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षा कडून उद्धव ठाकरे यांची सभा घेण्यात आली यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशा मागणीची निवेदन देण्यात आले होते दरम्यान लोकसभेसाठी अद्याप कोणत्याच पक्षाकडून मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळाल्यास मी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचेही रफिक भाई आत्तार यांनी सांगितले.
