Top News

शिरढोण परिसरात राष्ट्रीय पल्स पोलीओं मोहीमेस उत्तम प्रतिसाद

 


      

हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

  शिरढोण परिसरात राष्ट्रीय पल्स पोलीओं मोहीमेस उत्तम प्रतिसाद लाभला ‌‍‌‍0 ते 5 वयोगटातील बालकांना रविवार दिनांक 3 मार्च २०२४ रोजी आरोग्य उपकेंद्र मालभाग ,ग्रामपंचायत हनुमान मंदिर गावभाग व कन्या विद्या मंदिर गावभाग शिरढोण येथे प्लस पोलीओं डोस देण्यात आले. ते 5 वयोगटातील बालकांना पल्स पोलीओं डोस देण्यासाठी शाळा ,आरोग्य केंद्र ,आरोग उपकेंद्र ,आशा वर्कर ,विद्यार्थी यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात जन जागृती करण्यात आली होती.शिरढोण परिसरात प्रत्येक पोलीओं बुत ठिकाणी जाऊन प्राथमिक आरोग केंद्र नांदणीचे वैद्यकीय अधिकारी वासंती पाटील यांनी भेटी देऊन मार्गदर्शन व सूचना दिल्या.दरम्यान पोलीओं बुतसाठी डॉक्टर अश्विन चव्हाण,आरोग सेविका दिपाली ढाले व सर्व आशा वर्कर यांनी उत्तम नियोजन करून सर्व बालकांना पोलीओं डोस देण्यासाठी प्रयत्न केले.ग्रामस्थ व महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

शिवार न्युज साठी प्रतिनिधी हैदर‌अली मुजावर शिरढोण

थोडे नवीन जरा जुने