Top News

शिरोळ पंचगंगा नदीला पुन्हा जलपर्णीचा विळखा


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिरोळ तालुक्याची जीवनदायी म्हणून ओळखली जाणाऱ्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर आणि बिकट होत चालला आहे प्रशासनातील दुर्लक्षामुळे पंचगंगा प्रदूषण प्रश्न म्हणजे भिजत घोंगडे असाच झाला आहे शिरोळ येथील पंचगंगा नदी पात्राला पुन्हा एकदा जलपर्णीचा मोठा विळखा पडला आहे यामुळे जलचर प्राण्यांना धोका झाला असून पाणी प्रदूषणातही वाढ होत आहे यामुळे तात्काळ प्रशासनाने लक्ष घालून नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी पंचगंगा नदीकाठातील शेतकरी आणि नागरिकांच्यातून होऊ लागली आहे.

एकेकाळी शिरोळ तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जीवनदायी नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीला प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष जबाबदार असल्याची मानसिकता तालुक्यातील जनतेची झाली आहे गेल्या वीस वर्षापासून पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यास प्रशासनाला अपयश आले यामुळे या परिसरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे या परिसरात कॅन्सरचे प्रमाण वाढले आजाराने अनेक नागरिकांचा बळी गेला तरीही याचे गांभीर्य प्रशासनाला उरले नाही विविध कारखान्याचे रासायनिक मैलामिश्रित पाणी विविध शहर आणि गावातील सांडपाणी हे सर्व पाणी पंचगंगा नदीत मिसळत गेले आणि पंचगंगा नदी गटारगंगा बनली अशातच सातत्याने पंचांगा नदीपात्रास जलपर्णीचा विळखा पडत आहे याकडेही प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही सध्या शिरोळ येथील पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठली आहे यामुळे जलचर प्राण्यांना धोका पोहोचून नदी प्रदूषणात वाढ होत आहे परिणामी जनावरा व मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे यावर्षी ऐन मार्च महिन्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे अनेक ठिकाणी नदीचे पात्र कोरडे पडले आहे अशातच जलपर्णी साठली असल्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा दूषित पाणी प्यावे लागणार आहे पंचगंगा प्रदूषित मुक्त करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे यासाठी तात्काळ नदीपात्रातील जलपर्णी हटवण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवण्याची मागणी येथील शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे.

थोडे नवीन जरा जुने