Top News

-फोडीच्या राजकारणाला जनता आता कंटाळली : पंडित कांबळे

 कोल्हापुर / शिवार न्यूज नेटवर्क :

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीच्या सामाजिक न्याय विभागा मार्फत राज्यभर जिल्हा आढावा बैठक घेतल्या जात असून त्याच पार्श्वभूमीवर आज रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित (आण्णा) कांबळे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. त्यांचे आज सकाळी कोल्हापूरमध्ये आगमन झाले. त्यांनी प्रथम टाऊन हॉल बागेजवळील शाहू समाधी स्थळाला जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील व शहराध्यक्ष आर.के.पोवार यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून भेट दिली. त्यानंतर त्यांनी सर्किट हाऊस येथे कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाची पक्ष संघटनेची तालुकावार सविस्तर माहिती त्यांनी करून घेतली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पवार साहेबांचे विचार व पक्ष संघटना मजबूत असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. या आढावा बैठकीस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. शाहू, फुले, आंबेडकर चळवळीचे विचार व पवार साहेबांचे विचाराला मानणारी जनता येणाऱ्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा निश्चितच दाखवून देतील. भाजपाच्या या फोडा-फोडीच्या राजकारणाला जनता आता कंटाळली असून भाजपला राजकीय शह देण्यासाठी राज्यभर संविधान बचाव मेळावे घेण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार राजीव आवळे, प्रदेश सरचिटणीस अरुण काळे, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष संदीप बिरणगे, शहराध्यक्ष नागेश फरांडे, अरुण भंडारी तसेच सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने