Top News

कौशल्य प्रशिक्षण कोल्हापुरी फाउंडेशन कोल्हापूर सैनिक टाकळीत प्रशिक्षणाचा समारोप


संजय चव्हाण / शिवार न्यूज नेटवर्क :

सैनिक टाकळी ता. शिरोळ येथील ग्रामपंचायत हॉलम‌ध्ये ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग मार्फत गावातीत महिलांना कौशल्य प्रशिक्षण देणे अंतर्गत कलापूरी- फांऊडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने गेल्या एक महिन्या पासून अधिक काळ गावातील महिलांना बास्केट तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले .या प्रशिक्षणाचा समारोप ग्रामपंचायत सभागृहात पार पडला. कलापूरी फांउडेशनच्या वतीने प्रा. श्रीधर वैध्य, अर्पणा चव्हाण यांनी मनोगते केली.त्यांनी या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षित झालेल्या महिलांनी पूढे येऊन भविष्यात कलापूरी फांउडेशन सोबत काम करत रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार माजी उपसरपंच सुदर्शन भोसले यांनी मानले. यावेळी ग्रामसेवक सुनील वाघमोडे, सचिन कोळी, राम पाटील, श्रीकांत भोसले यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

थोडे नवीन जरा जुने