Top News

खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून विद्यामंदिर खणदाळ शाळेस २० लाखांचा निधी

सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :

 राजसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून खणदाळ येथील मॉडल स्कूल अतंर्गत विद्यामंदिर खणदाळ या शाळेस तब्बल २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून या विकास विकास कामांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. 

यावेळी बोलताना महाडिक युवाशक्तीचे प्रमुख गिरीश पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणसाचा विकास साधण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास महत्त्वाचा आहे. हाच उदात्त हेतू डोळ्या समोर ठेवून खासदार धनंजय महाडिक यांनी या परिसरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. खणदाळच्या विकासासाठी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून यापुढेही या गावच्या विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.

यावेळी शब्बीर मुल्ला, रेखाताई हत्तरकी, सरपंच रवी यारकदावर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 


थोडे नवीन जरा जुने