अभिनंदन सुंके / शिवार न्यूज नेटवर्क :
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हायस्कूल मधील उपक्रमशील शिक्षक अजित हरी पाटील यांनी सादर केलेला एकात्मिक शिक्षणाचा झरा, परसबाग खरा या नवोपक्रमास 'माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक' या गटातून दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. त्या प्रसंगी डॉ.कमलादेवी आवटे (उपसंचालक, राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे) डॉ.शोभा खंदारे . सहसंचालक डॉ. दत्तात्रय थिटे (विभाग प्रमूख) यादी मान्यवर उपस्थित होते.
