Top News

दत्तवाड मध्ये मटका बुकीवर कारवाई ; पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

       दत्तवाड (ता.शिरोळ)येथे कल्याण मटका घेताना दोन जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहेत त्यांच्याकडून 13 हजार,800 रुपये रोख रकमेसह 1लाख, 78 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    मटका घेणारे प्रशांत आण्णासो पाटील(वय39,रा.कवठेगुलंद ता. शिरोळ),अलताफ मेहबुब अपराध(वय.21,रा.दत्तवाड)आणि मटका बुक्की तौफिक सिकंदर शेख,ओंकार मांजरे(दोघे रा. कुरूंदवाड) या चार जणांच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   मटका बुक्की शेख आणि मांजरे यांच्या फायदा करिता दत्तवाड येथे वेगवेगळ्या ठिकाणी प्रशांत पाटील आणि अल्ताफ अपराध हे पैसे घेऊन मटक्याच्या चिठ्ठ्या देताना रंगेहात मिळून आले. दोघाकडून रोख रकमेसह केटीएम कंपनीची आणि हिरो स्प्लेंडर कंपनीची अशा दोन दुचाक्या,मोबाईल आणि मटक्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

थोडे नवीन जरा जुने