Top News

पोलीस व पत्रकारांचे नाते सुदृढ रहावे : विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी

कोल्हापुर डिस्ट्रीक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचा पत्रकार दिन संजय घोडावत विद्यापीठमध्ये संपन्न


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

             पत्रकारितेतून सत्य भूमिका मांडली जाते. पोलीस व पत्रकारांचे नाते सुदृढ राहावे. सध्याच्या पत्रकारीतेमध्ये खूप बदल झाले असले तरी पुस्तका इतकेच वृत्तपत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी व्यक्त केले. ते अतिग्रे येतील संजय घोडावत विद्यापीठ येथील कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या पत्रकार दिन समारंभात बोलत होते अध्यक्षस्थानी दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे होते. 

         सुनील फुलारी पुढे म्हणाले , पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारितेमध्ये चांगल्या माणसांची गरज आहे. पोलीस प्रशासन व पत्रकारांनी एकमेकांना विश्वासात घेऊन बोललं की गैरसमज दूर होऊन निष्पक्षपणे व समजूतदारपणे काम करता येते. तसेच नवोदित पत्रकारांनी जुन्या संपादकांचे लेखन समजून घेतले पाहिजे. 

         अध्यक्षस्थानावरून बोलताना तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी सांगितले. सध्या शोध पत्रकारितेची खूप गरज आहे. शोध पत्रकारितेतुन जगातील अनेक राष्ट्राध्यक्षांना राजीनामे द्यावे लागले आहेत. त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये गोपनीयता राखणे व पडताळणी करणे खूप महत्त्वाचे आहे. पत्रकारितेमध्ये इंटरनेटमुळे अमुलाग्र बदल झाले असून चौकस वृत्ती ठेवल्यास पत्रकारिता संपणार नाही.

       प्राचार्य विराट गिरी म्हणाले , पत्रकारितेचे नियम सांभाळून पत्रकारिता असावी. पत्रकारिता समाजाचा आरसा असून समाजाचे संघटन हाच उद्देश असतो. घोडावत विद्यापीठांमध्ये पत्रकारितेसाठी लागणारे विकसित सॉफ्टवेअरसह अन्य साहित्य उपलब्ध आहे. तरी त्याचा लाभ सर्वच पत्रकारांनी घेण्याचे आवाहन केले. 

       यावेळी बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लांनी यांनी मनोगत व्यक्त केले. असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविक मनोगत मांडताना संघटनेची भूमिका व भविष्यकाळातील ध्येय धोरणाचा आढावा घेतला. संघटनेचे वार्षिक अहवाल वाचन सचिव सुरेश पाटील यांनी केले . स्वागत उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांनी केले. यावेळी संघटनेच्या 'जागल्या ' स्मरणिकेचे व प्रा. रवींद्र पाटील यांनी लिहलेल्या 'माणसांची किंमत ' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल मंडपे यांनी केले.

        कार्यक्रमात जिल्हा व तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देण्यात आले. जिल्हा उत्कृष्ट पुरस्कारामध्ये रणजीत माजगांवकर , डॅनियल काळे प्रा. शामराव पाटील , दिलीप पाटील , आनंदा काशीद तर तालुका उत्कृष्ट पुरस्कार रवींद्र पाटील , गजानन खोत , गणपती लुगडे, दिनकर गुरव, शिवाजी येडवान , विलास कागणकर , रामचंद्र रोटे , विलास पाटील , सरदार काळे , कृष्णात हिरवे , कृष्णात उर्फ संतोष माळी , शशिकांत भोसले , अतुल भोजने , गणपती कोळी , सुहास जाधव , संभाजी पाटील , रवींद्र देसाई , मारुती घाटगे व संभाजी जाधव यांना देण्यात आले

        कार्यक्रमास खजानिस सदानंद उर्फ नंदू कुलकर्णी , ॲड. प्रशांत पाटील, डॉ.दगडू माने, सुरेश कांबरे, धनाजी गुरव, अवधूत आठवले, सतीश पाटील, विनायक पाटील, डॉ. निवास वरपे, प्रा. अशोक पाटील, बाळासाहेब चोपडे, बाळासाहेब कवडे, प्रकाश तिराळे, रवींद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो पत्रकार व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने