हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
अक्कलकोट येथील स्वामी समर्थ पालखी पालखी परिक्रमाचे हेरवाड येथील सुधीर माळी यांच्या निवासस्थानी उद्या मंगळवारी सकाळी ८ वाजता आगमन होणार असल्याने या पालखी पादुका परिक्रमेच्या दर्शनाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सुधीर माळी यांनी केले आहे.
२५ नोव्हेंबर ते १२ जून २०२४ अखेर संपूर्ण महाराष्ट्रभर श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. उद्या मंगळवार १९ रोजी सकाळी आठ वाजता पालखी पादुका परिक्रमेचे हेरवाड येथे आगमन होणार असून सकाळी आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तरी हेरवाड सह परिसरातील भाविकांनी या पालखी पादुका परिक्रमेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माळी यांनी केले.
