Top News

हरोली येथून ५ जानेवारीला श्रीक्षेत्र आदमापूरला बाळुमांमाची पायी दिंडी प्रस्थान होणार

 हरिभक्त गुरुवर्य श्री बिरदेव विठ्ठल माने महाराज यांच्या पुढाकारातून दिंडीचे आयोजन : धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

हरोली ( ता शिरोळ ) येथील श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिर ट्रस्ट व श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी सांप्रदायिक मंडळ यांच्या वतीने शुक्रवारी ५ जानेवारी ते मंगळवारी ९ जानेवारी अखेर श्रीक्षेत्र हरोली ते श्रीक्षेत्र आदमापूर पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती संत सद्गुरू बाळुमामा मंदिर ट्रस्टचे हरिभक्त गुरुवर्य श्री बिरदेव विठ्ठल माने महाराज यांनी दिली.

      दरम्यान, या पायी दिंडी सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमासह सहभागी भाविकांसाठी निवास , भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

      हरोली (ता शिरोळ) येथील संत सद्गुरु बाळूमामा मंदिरापासून शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र हरोली येथून श्रीक्षेत्र आदमापूर दिशेने पायी दिंडी रवाना होणार आहे. मार्गस्थ झालेली ही दिंडी कबनूर, पट्टणकोडोली ,कोगनोळी , कुरणी येथे दुपारचा विसावा व भोजनासाठी थांबेल . त्यानंतर सायंकाळी उपस्थित भक्तगणांना चहा नाश्ता मिळेल.

त्याशिवाय श्रीक्षेत्र आदमापूर पायी दिंडीतील मुक्काम स्थळी प्रवचन व भजन सेवा निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये नामांकित कीर्तनकार भजन प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी ११ जानेवारी रोजी हरोली येथे संध्याकाळी ६ वाजता दिंडी परतीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला असून यावेळी महाआरती व महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन संत सद्गुरू बाळुमामा मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने