Top News

कलाविश्‍व रंगभूमीतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 येथील कलाविश्‍व रंगभूमी व सोशल फौंडेशन संस्थेच्या वतीने संस्थेचा वर्धापन दिन व मराठी रंगभूमी दिनानिमित्त शिरोळ तालुक्यातील कलाकार, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा समारंभ सोमवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या जनरल ऑफीस सभागृहात होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान व उपाध्यक्ष रावसाहेब भोसले यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान यावेळी सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचालीबाबत ‘आम्ही रंगकर्मी विशेषांकाचे’ प्रकाशन होणार आहे. 

        यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तहसिलदार अनिलकुमार हेळकर व गटविकास अधिकारी शंकर कवितके हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा नेते पृथ्वीराज यादव, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आशाताई गाडीवडर-शिंदे, सिनेअभिनेत्री रेश्मा शेख, दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, दरगू गावडे, शिरोळ पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर.पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील-कणंगलेकर यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकार उपस्थित राहणार आहेत. 

         या वर्षीचे जाहीर झालेले पुरस्कार असे 

दिव्या मगदूम (उदगांव)-संगीत प्रेरणा पुरस्कार, पियुष काकडे (शिरोळ) - नाट्यप्रेरणा पुरस्कार, हौशी कलाकार अविनाश सुर्यवंशी (यड्राव)-आदर्श रंगकर्मी पुरस्कार,   

 प्रज्ञा माळकर (शिरोळ)-वक्तृत्व प्रेरणा पुरस्कार, माजी सैनिक संजय माने (जयसिंगपूर)- सेवारत्न पुरस्कार, सुनिल संकपाळ (शेडशाळ)-आदर्श पत्रकार पुरस्कार, संतोष साने (यड्राव)-आदर्श पत्रकार पुरस्कार, बाळासाहेब माळी (शिरोळ)-आदर्श पत्रकार पुरस्कार व अनिल उर्फ राजू देशमुख (शिरोळ)-दिव्यांग सेवारत्न पुरस्कार.

थोडे नवीन जरा जुने