हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेचा उद्घाटन तसेच धनादेश वितरण समारंभ मंगळवारी सकाळी दहा वाजता आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या हस्ते तसेच खासदार संजय मंडलिक, मयूर उद्योग समूहाचे संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन सुनील माळी व व्हाईस चेअरमन बापू बरगाले यांनी दिली.
शेतकरी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था गाव मध्ये नव्याने स्थापन करण्यात आली आहे येथील स्टॅन्ड चौक येथे असणाऱ्या एसएम कॉम्प्लेक्स येथे या संस्थेचा उद्घाटन सोहळा करण्यात येणार असून यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक संभाजी पाटील, दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, सहाय्यक निबंधक अनिल नादरे, माणिकराव पोळ, सरपंच रेखा जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याची माहिती चेअरमन माळी यांनी दिली.
यावेळी संचालक बिरू देबाजे, मारुती माळी, देवगोंडा आलासे, दत्तात्रय जोंधळे, प्रकाश कांबळे, दत्तात्रय झंजे, संजय नेर्ले, बापू जमादार, प्रतिभा पाटील, क्लार्क समीर मुल्ला, सचिव सुनील मस्के उपस्थित होते.
