जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर येथील प्रथितयश अशा संजीवन हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अँजिओग्राफी व एन्जोप्लास्टी तसेच डायलेसिस या दोन नवीन विभागाची सुरुवात माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभहस्ते व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी संजीवन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रवीण जैन व डॉ. व्यंकटेश पत्की यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डॉ. अजित भोरे, डॉ. निखिल पाटील, डॉ. खोलखांबे, डॉ. खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
