Top News

प्रा.महेश गायकवाड पीएचडी सर्वोच्च पदवीने सन्मानित

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये कार्यरत असलेले संगणक विषयाचे प्राध्यापक महेश कुमार गायकवाड यांना नुकतीच भोपाळ युनिव्हर्सिटी ने पीएचडी या सर्वोच्च पदवीने सन्मानित केले.श्री सत्य साई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मेडिकल सायंन्स भोपाळ या विद्यापीठ कडून शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च अशी कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनियरिंग या शाखेतील पी. एच. डी.(डॉक्टरेट) पदवी त्यांना मिळाली .कुरुंदवाड नगरीतील सुपरिचित माजी मुख्याध्यापक श्री परशराम राऊ गायकवाड यांचे सुपुत्र डॉ. महेश कुमार यांचे याबद्दल कौतुक होत आहे या यशामध्ये त्यांना संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे अध्यक्ष मा .संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले,निबंधक डॉ. विवेक कायंडे तसेच युनिव्हर्सिटीतील सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच डॉ. राकेश धुमाळे आणि सर्व कुटुंबीय व हितचिंतक यांच्या प्रेरणेतून त्यांना हे यश प्राप्त झाले.या यशाबद्दल त्यांचे सर्व च स्तरातून कौतुक होत आहे.

थोडे नवीन जरा जुने