शिरटी / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरटी ता शिरोळ येथील २ ऑक्टोबर २०१२ रोजी लावलेल्या वृक्षांचा ११ वा वाढदिवस शिरटी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिरटी येथील चावडी कट्टा ग्रुप च्या वतीने दहा वर्षांपूर्वी म्हणजे २ ऑक्टोबर २०१२ रोजी चौकातील पारकट्टावर कै. जिनगोडा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानंतर गेली दहा वर्षे ग्रुपच्या सदस्यनी व ग्रामस्थांनी या वृक्षांचे संवर्धन केले सोमवारी गांधी जयंती दिवशी या झाडाचा ११वा वाढदिवस सायंकाळी सात वाजता अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
झाडाला फुले बांधण्यात आली. परिसरात रांगोळी रेखाटन करण्यात आली. झाडाच्या भोवती मेणबत्ती लावण्यात आल्या तसेच फुलांच्या माळ्या ही लावण्यात आल्या होत्या.
यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
रामगोडा पाटील यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आणासो मगदुम,आणासो चौगुले, विकास चव्हाण, नितीन चौगुले,दादा गतारे,कुबैर पाटील,राजु कोगनोळे, रफिक रांगोळे, आण्णासो सुतार सुर्यकांत उदगावे,भाऊसो पाटील, राहुल ढेकळे,गुडापा मुलाण्णी, संदिप ढेकळे, अभिजित होरे, प्रमोद चव्हाण,रियाज मुलाण्णी, चंद्रकांत परीट,शरद चौगुले, महेश हत्ती,अमर खोबरे, उत्कर्ष भंडारे, दिगंबर भादरगे,मनोज पाटील,भुपाल रोजे,अशोक गतारे,अझर रांगोळे, संदिप भोसले, जितेंद्र कांबळे, मनोज कांबळे, सचिन खोबरे,सागर टारे, नितीन चौगुले, सिकंदर मुलाणी,अलम मुल्लाणी, सिकंदर रांगोळे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी वाढदिवसाच्या कार्येक्रमचे नियोजन करण्यामध्ये हिरिरीने सहभाग घेणारा चौकातील पानपट्टी व्यवसायिक दस्तगीर मुलाण्णी (पिटु) यांचे दोन वर्षापुर्वी कोरोनाने निधन झाले दरवर्षी कार्यक्रम करण्यामध्ये तो पुढे पुढे असायचा मात्र तो नसल्याची उणीव मित्रांना व ग्रामस्थांना जाणवत होती.
