उदगांव / शिवार न्यूज नेटवर्क :
धनगर समाजास एस.टी.आरक्षण अंमलबजावणी होण्यासाठी चौंडी (जि.अहमदनगर) येथे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवार (दि.25) रोजी उदगांव (ता.शिरोळ) येथील माळ भागावरील श्री उदयसिध्द बिरोबा मंदिरात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शिरोळ तालुका धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी पत्रकांराना दिली.
उदगांव येथे शिरोळ तालुका धनगर आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पदाधिकारी म्हणाले, संदिप गावडे, दिपक ठोबरे, अमोल मरळे हे आमरण उपोषणास बसणार आहेत. याला पाठिंबा देण्यासाठी शिरोळ तालुकयातील गावा-गावातून समाज एकत्रित येवून यात सहभागी होणार आहेत. जो पर्यत चौंडी येथील उपोषण मागे घेतले जात नाही तो पर्यत हे उपोषण सुरु राहणार आहेत. त्याचबरोबर गावा-गावात आंदोलनाला बळ देण्यासाठी वेगवेगळया पध्दतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारने धनगर आरक्षणांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी आहे. तरी तालुक्यातील समाज बांधवानी सहभागी होण्याचे अहवान करण्यात आले आहे.
यावेळी अमर पुजारी, बाळासाहेब बंडगर, संजय माने, रामभाऊ बंडगर, दिपक ठोंबरे, संदिप गावडे, अशोक कोळेकर, रामचंद्र डांगे, सुरेश गवंडी, संजय अनूसे, श्रावण गावडे, अमोल मरळे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील धनगर समाज्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
