शिरोळ येथे मंडळातर्फे विविध कार्यक्रम : मनोरंजनात्मक सजीव देखावा सादरीकरण
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील श्री संत रोहिदास कला , क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अमाप उत्साहात व भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे . या मंडळातर्फे गणेशोत्सव निमित सोमवारी आयोजित श्रींच्या पूजा - आरती चा सोहळा चर्मकार समाजाचे मार्गदर्शक व अभिनेते डॉ दगडू श्रीपती माने व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीता दगडू माने (विशेष कार्यकारी अधिकारी ) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील अर्जुनवाड रोडवरील श्री संत रोहिदास नगर येथे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे . संत रोहिदास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विनोदी सजीव देखावाही सादर केला आहे. सोमवारी सायंकाळी डॉ.दगडू माने व परिवार यांच्या हस्ते संत रोहिदास मंडळाच्या बाप्पांची आरती व पूजा करण्यात आली .
यावेळी डॉ.दगडू माने यांनी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करा. प्रत्येक माणसाचे जीवन सुख , शांती, समाधानी व चांगले आरोग्यदायी रहावे अशी श्रींच्या चरणी प्रार्थना केली. या आरती सोहळ्यास मंडळाचे सदस्य महेश माने, राजू माने, संदिप माने, नंदकुमार माने, शशिकांत राजमाने, ओम माने, ऋषिकेश माने, दीपक माने, श्रेयश माने, आकाश देवकारे, रोहन माने, वैभव माने यांच्यासह मंडळाचे युवक कार्यकर्ते , महिला व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
