शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या "माझी माती, माझा देश" मातीला नमन, वीरांना वंदन या उपक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरून करण्यात आला
याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते माझी माती माझा देश या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रदेश महामंत्री अनुप मोरे, प्रदेश महामंत्री सुदर्शन पाटसकर, प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे, प्रिया पवार, अजिंक्य टेकावडे, श्रीराज ढेरे, विजयेंद्र माने, प्रदेश सचिव कोल्हापूर पूर्व प्रभारी सागर वनखंडे,सुशांत पाटील,अजित कुलथे, तेजस्वीनी कदम, पांडुरंग वहीले, रवि तिवारी, सौरभ कुंडलिक, रौनक शेट्टी अनिकेत हरपुडे प्रवीण फोंडे विद्यार्थी विभाग संयोजक रमाकांत कापसे, प्रशांत सपकाळे, स्वप्निल काळे, भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुत्ते पाटील जुन्नर विधानसभा प्रमुख आशाताई बुचके, मंडल अध्यक्ष संतोष खैरे, पुणे उत्तर जिल्हा अध्यक्ष संदीप सातव, सुशांत पाटील, अक्षय वरपे,सुहास जाधव , प्रविण रांगोळे, प्रकाश मुधाळे, विश्वास पाटील, कृष्णा पाटील, लखन जमादार, इंद्रजित जाधव यांच्यासह शेकडो युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी "छत्रपती शिवाजी महाराज की जय", "जय भवानी, जय शिवाजी", "जय जिजाऊ जय शिवराय" अशा घोषणा देत पायी गड चढून घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता
शिवनेरी किल्ल्यावरील माती कलश घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मातीला नमन वीरांना वंदन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली राज्यभरातून या माती कलशाचे संकलन करण्यात येणार असून शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे या उपक्रमाची सांगता होणार आहे
