Top News

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज : युवा नेते उत्तम पाटील

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

         आज सर्वत्र वृक्षारोपण करण्यात येत आहे पण त्यांचे संगोपन करणे तितकेच गरजेचे आहे .आज वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.

 आज स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात युवा नेते उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 नगरपंचायत वतीने बोरगाव व उपनगरांमध्ये सुमारे 500 वृक्षांचे रोपण झाले असून यासाठी नागरिकांनीही याचे महत्त्व जाणून वृक्षारोपणावर अधिक भर द्यावे असे आवाहन यावेळी उत्तम पाटील यांनी केले.

याप्रसंगी प्रभारी मुख्याधिकारी राहुल गुडयीनकर आरोग्य अधिकारी विलोल जोशी, महसूल निरीक्षक संदीप वाईंगडे, द्वितीय चर्चा सहाय्यक पोपट कुरळे, तलाठी विठ्ठल ढवळेश्वर, नगरसेवक अभय मगदूम , माणिक कुंभार, बाहुबली सोबने,प्रदीप माळी,पिंटू कांबळे ,रोहित पाटील,सौ शोभा हावले, गिरिजा वठारे, अश्विनी पवार, रोहिणी सोबाने, संगीता शिंगे,यांच्यासह सर्व नगरसेवक अंगणवाडी, आशा कार्यकर्ते ,आरोग्य पदाधिकारी व शहरवासीय उपस्थित होते.

   

थोडे नवीन जरा जुने