Top News

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शिरोळ तालुक्यात १८ कोटी ५० लाखाच्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन संशोधन व विकास योजनेअंतर्गत शिरोळ तालुक्यातील वीस किलोमीटर अंतराच्या रस्त्यांसाठी १८ कोटी ५० लाखांच्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून मंजूर निधीतून लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होईल अशी माहिती माजी राज्यमंत्री आणि शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे, जुलै २०२३ मध्ये रस्त्यांच्या या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती त्यानुसार बुधवारी प्रत्यक्ष या कामांची निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे शिरोळ तालुक्यातील हे सर्व रस्ते लवकरच मजबूत होणार आहेत, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत शिरोळ तालुक्यातील औरवाड, गौरवाड, शेडशाळ, गणेशवाडी ते महाराष्ट्र राज्य हद्दीपर्यंत इजीमा क्रमांक १८३ या १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ९ कोटी ६१ लाख ४५ हजार रुपये,

शिरोळ ते घालवाड ग्रामा १४ या ४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ३ कोटी ६६ लाख ८४ हजार रुपये, शिरढोण ते तेरवाड ग्रामा ३० या २.३०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २ कोटी ०७ लाख ११ हजार रुपये, जांभळी चव्हाणवाडी ते पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट ग्रामा ८२ या २ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १ कोटी ४५ लाख ९० हजार रुपये, रामा १९५ अब्दुललाट पैकी बरगाले वसाहत ग्रामा ६८ या २ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १ कोटी ६९ लाख २२ हजार रुपये असे शिरोळ तालुक्यातील एकूण २० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी जवळपास १८ कोटी ५० लाख ५२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकात म्हटले आहे,

शिरोळ तालुक्यातील या महत्त्वाचे दुरुस्त व मजबूत व्हावेत अशी त्या त्या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षाची मागणी होती, मंजूर झालेल्या निधीमधून हे रस्ते मजबूत होणार असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे असे सांगताना रस्त्यांच्या या कामांना निधी मंजूर करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.


थोडे नवीन जरा जुने